क्रूरतेचा कळस! रुग्णाला फरफटत नेलं अन् बेदम मारलं; रिहॅबिलिटेशन सेंटरमधील भयंकर घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 10:32 IST2025-04-16T10:31:36+5:302025-04-16T10:32:30+5:30
एका रिहॅबिलिटेशन सेंटरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

फोटो - ndtv.in
कर्नाटकमधील एका रिहॅबिलिटेशन सेंटरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये एका रुग्णाला क्रूरपणे मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. आरोपी सर्वात आधी रुग्णाला फरफटत नेताना दिसतो आणि नंतर त्याला सतत काठ्यांनी मारहाण करताना दिसतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी उपचार घेत असलेल्या व्यक्तीला एका खोलीत कोंडून ठेवतो आणि नंतर त्याला सतत काठीने मारहाण करत आहे. तिथे उपस्थित असलेले इतर लोक हे सर्व पाहत आहेत. हा व्हिडीओ बेंगळुरुपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या नेलमंगला ग्रामीणमधील एका खासगी रिहॅबिलिटेशन सेंटरचा असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, परंतु ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मेरठमधील रिठानी भागातील एका सुशिक्षित कुटुंबात घडलेल्या रहस्यमय घटनांमुळे संपूर्ण गाव दहशतीत आहे.
खळबळजनक! सुशिक्षित कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं, स्मशानभूमीतून आणली राख अन्...
ओमप्रकाश यांच्या कुटुंबावर कोणीतरी जादूटोणा केला, ज्यामुळे सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. कुटुंबातील सदस्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आणि आता ते रस्त्यावर भटकत आहेत. ओमप्रकाश यांचा धाकटा मुलगा अनुज याचा रविवारी मृत्यू झाला, त्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ओमप्रकाश यांचे मोठा भाऊ सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील पाच सदस्यांवर काळी जादू करण्यात आली आहे. अनुजचा मृत्यू झाला आहे आणि कुटुंबातील इतर सदस्यांची मानसिक अवस्था बिघडली आहेत. ओमप्रकाश यांची चारही मुलं अभ्यासात हुशार होती.