कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 21:10 IST2022-02-08T21:03:51+5:302022-02-08T21:10:51+5:30
Deadbody Found in Car : गोरेगाव येथील राम मारुती रोड परिसरातील आस्मि इंड्स्ट्रीयललगत ही कार मिळून आली.

कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
मुंबई : गोरेगाव येथे एका इंडस्ट्रीच्या मागे पार्क केलेल्या कारमध्ये मंगळवारी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
गोरेगाव येथील राम मारुती रोड परिसरातील आस्मि इंड्स्ट्रीयल लगत ही कार मिळून आली. मंगळवारी दुपारच्या सुमारास पालिका कर्मचारी येथे धूळखात पडलेल्या वाहनांवर कारवाईसाठी गेले असताना त्यामध्ये हा मृतदेह मिळून आला. त्यांच्याकड़ून पोलिसांना माहिती मिळताच, गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.