शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा सांगाडा सापडल्याने खळबळ; पतीने हत्या करून पुरले होते पत्नीला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 21:45 IST

Murder Case : मृत महिलेचे नाव शुगिया (२८) असं आहे. बबलू असं या महिलेच्या पतीचे नाव आहे. गेल्या महिन्याभरापासून महिला बेपत्ता होती. महिलेच्या माहेरचे लोक सतत तिचा शोध घेत पोलीस ठाण्याच्या येरझाऱ्या मारत होते.

उत्तर प्रदेश - सोनभद्र परिसरात एका महिलेचा सांगाडा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. हा सांगाडा सोनभद्र शहरातील अनपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सापडला आहे. मृत महिलेचे नाव शुगिया (२८) असं आहे. बबलू असं या महिलेच्या पतीचे नाव आहे. गेल्या महिन्याभरापासून महिला बेपत्ता होती. महिलेच्या माहेरचे लोक सतत तिचा शोध घेत पोलीस ठाण्याच्या येरझाऱ्या मारत होते. मात्र, ती महिला बेपत्ता झाली नसून पतीनेच पत्नीची हत्या करून जंगलात मृतदेह पुरला होता. याप्रकरणी पोलिसांनी सासू आणि सासरे यांना बुधवारी अटक केली आहे. 

अनपरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्रीकांत राय यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी  सिदहवां निवासी  बबलू केवट आणि त्याची पत्नी शुगिया (२८) यांच्यात भांडण झाले होते. माहिती मिळताच शुगियाचे कुटुंबीय  सिदहवां  येथे पोहोचले. दोन्ही बाजूंनी पंचायत झाल्यानंतर मुलीची समजूत घातल्यानंतर, सकाळी पुन्हा येतो, असे सांगून माहेरची लोकं रात्री नऊ वाजता आपल्या घरी निघून गेले.कुटुंबीयांनी गुन्हाही दाखल केला होतासकाळी पुन्हा  सिदहवां  येथे पोहोचल्यावर बबलूने आपली मुलगी पळून गेल्याचे सांगितले. एका आठवड्यानंतर, बबलू स्वत: अनपरा पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या तीन मुलांच्या संगोपनाचा हवाला देत पत्नीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आई-वडिलांनीही सून आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.दोन्ही पक्षांचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तपासात गुंतले होते. दरम्यान, मंगळवारी एका ठिकाणी महिलेचे काही कपडे पडलेले आढळून आले. तेथून निघणाऱ्या दुर्गंधीच्या आधारे पोलिसांनी तेथे खोदकाम केले असता, तेथून महिलेचा सांगाडा सापडला. जप्त केलेले कपडे कुटुंबीयांनी शुगियाचे असल्याचं सांगितले. 

मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीमुळे शुगियाचा मृत्यू झाल्याचे पतीने सांगितले. नंतर नातेवाईकांच्या सांगण्यावरून मृतदेह जंगलात नेऊन रात्रीच पुरला. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी मारहाणीत वापरलेली काठीही जप्त केली आहे. मृताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती बबलू केवट, सासरा रामधेन आणि सासू मनबसिया यांना सायंकाळी उशिरा अटक करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक