शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात पुजारी आणि साध्वीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 21:52 IST

Murder Case : दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी मंदिरात आढळून आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. 

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने खळबळ माजली आहे. एका मंदिरामध्ये पुजारी आणि साध्वीची हत्या करण्यात आली. दोघांच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी मंदिरात आढळून आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आजूबाजूच्या लोकांकडे पोलिसांनी चौकशी केली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून मंदिरातील पुजारी आणि साध्वीच्या हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महदेईया गावातील रामरतन मिश्र यांनी गावात स्व:ताच्या पैशाने मंदिर उभारले होते. या मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून नेपाळमधील ढकधइया चेनपुरवा येथील महिला कलावती (६८) राहायची. ती या मंदिरात पूजाआर्चा करत असे. काही दिवसांपूर्वी पुजारी रामरतन मिश्र हे वाराणसीहून हनुमानाची मूर्ती घेऊन आले होते. मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी भोजनाचे आयोजन केले होते. आज सकाळी गावकरी मंदिरात गेले तेव्हा पुजारी आणि साध्वीचा मृतदेह आढळून आला. नंतर त्यांनी पोलिसांनी घटनेबाबत माहिती दिली. ही हत्या कोणत्या कारणांमुळे करण्यात आली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसTempleमंदिर