कल्याणात "या " बिल्डरच्या कार्यालयावर हल्ला केल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 15:44 IST2021-10-16T15:43:31+5:302021-10-16T15:44:18+5:30
Attack on Builder Office : रात्रीच्या सुमारास अचानक हल्लेखोरांनी कार्यालयाच्या काचा फोडत सुरक्षारक्षकाला देखील मारहाण केली आहे.

कल्याणात "या " बिल्डरच्या कार्यालयावर हल्ला केल्यानं खळबळ
कल्याण - कल्याणमध्ये एका बिल्डरच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे. बिल्डर संजय गायकवाड यांच्या कार्यालयावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. कल्याण पुर्वेतील विजयनगर अमराई परिसरात ही घटना घडली आहे.
रात्रीच्या सुमारास अचानक हल्लेखोरांनी कार्यालयाच्या काचा फोडत सुरक्षारक्षकाला देखील मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तोंडाला रुमाल बांधुन हे हल्लेखोर आले होते. लाडकी दांडक्यानं त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. त्यानंतर शिवीगाळ करत वॉचमनला देखील मारहाण केली. ऐन दस-याच्या दिवशी हा सर्व प्रकार घडल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारे हे इसम कोण? हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.