दादरमध्ये खळबळ, सोसायटीच्या आवारात वाहनचालकाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 22:21 IST2022-07-21T22:20:29+5:302022-07-21T22:21:50+5:30
Suicide : शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद

दादरमध्ये खळबळ, सोसायटीच्या आवारात वाहनचालकाने केली आत्महत्या
मुंबई : शिवाजीपार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालमोहन शाळेसमोरील ओम को.ऑ.हौसिंग सोसायटीच्या परिसरात वाहन चालकाने आत्महत्या केली. त्यामुळे दादर परिसरात खळबळ माजली.
या सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करणारे त्रिमूर्ती बाळकृष्ण मूरकर (५०) यांनी आज पहाटे सोसायटीचे आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. ते वरळी जनता कॉलनी परिसरात राहण्यास होते. त्यांना दारूचे व्यसन होते. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.