खळबळजनक! बापाने केली मुलीची हत्या, आरोपी वडिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:15 IST2022-05-11T21:14:33+5:302022-05-11T21:15:05+5:30
Murder Case : या प्रकरणात दहेगाव पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केल्याची माहिती दिली.

खळबळजनक! बापाने केली मुलीची हत्या, आरोपी वडिलांना अटक
वर्धा : बापलेकीमध्ये सुरू असलेल्या वादात संतापलेल्या बापाने चक्क मुलीच्या डोक्यात सेंट्रींगच्या पाटीने प्रहार करत तिची हत्या केली. ही घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास हमदपूर येथे घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात दहेगाव पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केल्याची माहिती दिली.
पोलीस सूत्रांनुसार, मृतक 17 वर्षीय मुलीचे वडील विलास ठाकरे यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास मृतक मुलगी आणि तिचे वडील विलास ठाकरे जेवण करत असताना जेवण वाढण्यास उशीर का झाला या करणातून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या विलास ठाकरे याने घरात पडत पडून असलेल्या सेंट्रींग च्या पाटीने मुलीच्या डोक्यावर जबर प्रहार केला.
धक्कादायक! डोंबिवलीत बांधकाम व्यावसायिकाच्या वाहनचालकाचा गटारात आढळला मृतदेह
वाद सोडविण्यास मध्यस्ती दिलेली तिची आई आशा ठाकरे तिने वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र ती सुद्धा मुलीला वाचवू शकले नाही. आशा ठाकरे हिने याची माहिती वर्धा येथील सिंधी मेघे परिसरातील रहिवासी तिचा भाऊ प्रमोद राम महाडोळे याला दिली. घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली होती बेळगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आणि आरोपी वडिलाला अटक केली. पुढील तपास दहेगाव पोलिस करीत आहे.