पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात 

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 22, 2023 17:59 IST2023-08-22T17:58:59+5:302023-08-22T17:59:16+5:30

पंढरपूर शहरात संशयित दोघे मोटरसायकलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

Pandharpur, two people who were running motorcycles from Solapur are in police custody | पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात 

पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात 

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर  : पंढरपूर शहर आणि सोलापूर शहरातून मोटरसायकल पळवणा-या दोघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख ४३ हजार रुपयांच्या १५ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. योगेश सोमनाथ गटकुळ (रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर) व अनंत मसु कांबळे (रा. आव्हे, ता. पंढरपूर ) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

पंढरपूर शहरात संशयित दोघे मोटरसायकलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने 'साथीदाराच्या मदतीने चोरी केलेली चोरीची मोटरसायकल विक्रीकरिता घेऊन आलो' अशी कबुली दिली.  पंढरपूर शहर व सोलापूर शहरातून देखील मोटरसायकल त्याने चोरल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी योगेश सोमनाथ गटकुळ आणि अनंत कांबळे यांच्याकडून पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील व इतर ठिकाणी चोरलेल्या १५ मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Web Title: Pandharpur, two people who were running motorcycles from Solapur are in police custody