धक्कादायक! पत्नीची हत्या केली, ऑफिसला गेला, दिवसभर काम केलं, सायंकाळी थेट पोलीस ठाण गाठलं अन्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 11:49 IST2023-03-14T11:44:56+5:302023-03-14T11:49:02+5:30
पत्नीची सकाळी हत्या केली. घरातील सगळी कामं आवरली. ऑफिसला गेला.

धक्कादायक! पत्नीची हत्या केली, ऑफिसला गेला, दिवसभर काम केलं, सायंकाळी थेट पोलीस ठाण गाठलं अन्
पत्नीची सकाळी हत्या केली. घरातील सगळी कामं आवरली. ऑफिसला गेला. दिवसभर ऑफिसच काम केलं. काम आवरल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांत गेला आणि सकाळी घडलेला सर्व प्रकार पोलिसांनी सांगितला. आपण केलेला गुन्हा कबुल केला. ही घटना ऐकल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. ही धक्कादायक घटना पालघर येथील आहे.
पत्नीची हत्या चारित्र्याच्या संशयावरुन केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली. यात संशयाच्या कारणातूनच ही हत्या केल्याचे समोर आले.
युपीत एन्काऊंटरची दहशत; आरोपी पोलिसांना म्हणाला, आधी हातावर लिहून द्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय प्रभू विश्वकर्मा यांचा सात वर्षांपूर्वी २५ वर्षीय अनितासोबत विवाह झाला होता. दोघेही पालघरच्या नालासोपारा येथे राहत होते. प्रभू यांना अनेक दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नी अनिताचे दुसऱ्या पुरुषासोबत अवैध संबंध असल्याचे त्याला वाटत होते.
यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले होते. सोमवारीही या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हळुहळू हे प्रकरण मोठ्याने सुरू झाले. पतीने पत्नीला जोरदार मारहाण सुरू केली. रागाच्या भरात प्रभूने अनिताचा चेहऱ्याने उशी दाबली. यानंतर तिची गळा आवळून हत्या केली.
यानंतर आरोपी पती कामासाठी ऑफीसमध्ये गेला. दिवसभर कार्यालयात काम केले, त्यानंतर परतत असताना थेट पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याचवेळी प्रभूला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.