पी. चिदंबरम ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआयच्या ताब्यातच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 21:19 IST2019-09-03T21:18:26+5:302019-09-03T21:19:53+5:30
आता ही सुनावणी गुरुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पी. चिदंबरम ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआयच्या ताब्यातच राहणार
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पी.चिदंबरम गुरुवारपर्यंत सीबीआयच्या ताब्यातच राहणार असून त्याच दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्ट मंगळवारी त्यांना जामिनाबाबत निर्णय घेणार होतं. मात्र, चिदंबरम यांच्यातर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यासंदर्भातील सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली होती. आता ही सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 3 दिवसांची रिमांड संपल्यानंतर चिदंबरम यांना सोमवारी सीबीआयने न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांच्या जामीनासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला. सीबीआयने यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला कायद्यापुढे सगळे समान आहेत आणि जर असा अर्ज दाखल केला जात असेल तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणं गरजेचं असल्याने या अर्जावर निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात यावा असं सांगितलं होतं. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरून सुनावणी मंगळवारी ठेवली होती. मात्र, आता ही सुनावणी गुरुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.