शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डी कंपनी चालविण्यासाठी स्वतःचे नेटवर्क; दाऊदनं पठाण मुलीशी केला निकाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:32 IST

दाऊद सध्या कोणाच्याही थेट संपर्कात नसला तरी आपली गँग चालवण्यासाठी, कारभारासाठी अनेक चाळण्यांतून जाणारे स्वतंत्र नेटवर्क त्याने उभारले आहे

आशिष सिंहमुंबई - दाऊदने डी कंपनी चालवण्यासाठी स्वतःचे नेटवर्क तयार केले असून सांकेतिक भाषा आणि सहजासहजी उलगडता येणार नाही, अशा कोडवर्डचा वापर करून तो व्हॉइस मेसेज पाठवत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मिळवली आहे. 

दाऊदने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील आपला पत्ता बदलला असून सध्या तो कराचीत पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यातील जागेत राहत असल्याचा सुगावाही यंत्रणांना याच चौकशीत लागला आहे. याच काळात दाऊदने पाकिस्तानातील एका पठाण युवतीशी दुसरा निकाह केल्याची माहिती त्याने दिली. दुसरा निकाह करण्यासाठी दाऊदने पहिली पत्नी मेहजबीन हिला तलाक दिल्याचे सांगितले जात होते. पण त्यात तथ्य नाही. ती जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा होती. उलट मेहजबीन दाऊदच्या वतीने भारतातील नातलगांच्या संपर्कात असल्याची माहिती दाऊदचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह इब्राहीम पारकर याने एनआयएच्या चौकशीदरम्यान दिली.  

अर्थात, दाऊदने पाकिस्तानातील एका पठाण युवतीशी दुसरा निकाह केल्याची माहिती खरी असल्याचे त्याने सांगितले. गेल्या वर्षी जुलैत मेहजबीनला दुबईत भेटलो, तेव्हा तिनेच ही माहिती दिल्याचे तो म्हणाला. सण-वार आणि अन्य कारणांसाठी सध्या तीच दाऊदच्या नातलगांच्या, मित्र परिवाराच्या संपर्कात असल्याचे अली शाहने चौकशीत कबूल केले. 

दाऊदला मेसेज पाठवायचा असेल तर... आरिफ भाईजान त्याचा सांकेतिक भाषेतील आणि कोडवर्डचा वापर केलेला व्हॉइस मेसेज (एन्क्रिप्टेड व्हॉइस मेसेज) रेकॉर्ड करतो. तो उघडण्यासाठीही पासवर्ड असतो. हा मेसेज तो शब्बीर शेखला पाठवतो. शब्बीर शेख तो दुबईतील मध्यस्थ किंवा दाऊदचे व्यवहार सांभाळणाऱ्या जैदला पाठवतो. जैद आपल्या दुबईतील नंबरचा वापर करून तो मेसेज कराचीत छोटा शकीलला पाठवतो. तो मेसेज छोटा शकील दाऊदला सांगतो.

संरक्षण खात्याच्या जागेत मुक्कामदाऊद सध्या कराचीत अब्दुला गाजीबाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रहीम फाकी परिसरात असलेल्या संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहत आहे.

कसे चालते दाऊदचे नेटवर्क? दाऊद सध्या कोणाच्याही थेट संपर्कात नसला तरी आपली गँग चालवण्यासाठी, कारभारासाठी अनेक चाळण्यांतून जाणारे स्वतंत्र नेटवर्क त्याने उभारले आहे. त्यातून त्याच्या कंपनीतील लोकांना त्याचा मेसेज बरोबर पोहोचवला जातो, अशी माहिती छोटा शकीलचा मेव्हणा आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांच्या चौकशीतून उघड झाली.   

तो मेसेज ऐकल्यावर... दाऊद त्याचा निरोप किंवा सूचना छोटा शकीलला देतो. छोटा शकील त्याचे रूपांतर पुन्हा सांकेतिक भाषेतील व्हॉइस मेसेजमध्ये करतो. त्यालाही विशिष्ट पासवर्ड असतो. छोटा शकीलकडून तो मेसेज दुबईत जैदला पाठवला जातो. जैद दुसऱ्या नंबरवरून तो शब्बीरला पाठवतो. शब्बीर तो मेसेज आरिफ भाईजानला पाठवतो.

हवालासाठीही नेटवर्कहवालामार्फत केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठीही याच पद्धतीने सांकेतिक लिपीतील मेसेजचा वापर केला जातो. त्याचे मेसेज पाठवण्याचा आणि निरोप मिळवण्याचा क्रमही याच पद्धतीने असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे. यात वेगवेगळे नेटवर्क, नंबर वापरले जात असल्याने त्याचा माग काढणे कठीण बनते आणि सुरक्षा यंत्रणांना गुंगारा दिला जात असल्याचे चौकशीत उघड झाले. या पद्धतीने नेटवर्किंगचे, निरोप पाठविण्याचे वर्तुळ पूर्ण होते. याच सिस्टिमचा वापर करून सध्या दाऊदचा कारभार सुरू असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिम