मायलेकी घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; कुजलेले मृतदेह पोलिसांनी पाठवले शवविच्छेदनास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 16:57 IST2021-05-02T16:53:59+5:302021-05-02T16:57:00+5:30
DeadBodies Found :मृतक आई व मुलगी कुटुंबियापासून वेगळ्या राहत असे मुलगी सुरेखा ही आजारीच होती काही दिवसांअगोदर त्या हिंगणघाटवरून दवाखान्यातुन आल्या होत्या.

मायलेकी घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; कुजलेले मृतदेह पोलिसांनी पाठवले शवविच्छेदनास
समुद्रपूर(वर्धा) - तालुक्यातील सावंगी ( झाडे ) येथे रविवारी ( ता. दोन ) सकाळी १० वाजताच्या दरम्यान सडलेल्या अवस्थेत घरीच आई व मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून सुभद्रा डोमाजी मांडवकर (८०) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे ( ४५ ) असे मृतक आई, मुलीचे नावे आहेत.
मृतक आई व मुलगी कुटुंबियापासून वेगळ्या राहत असे मुलगी सुरेखा ही आजारीच होती काही दिवसांअगोदर त्या हिंगणघाटवरून दवाखान्यातुन आल्या होत्या. मात्र, त्या नंतर त्या बाहेर दिसल्या नाही रविवारी ( ता. दोन ) सकाळी मृतक महिलेची सुन जिजाबाई प्रकाश मांडवकर हिला दुर्गंध आली असता तिने मृतक महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता, दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. तिने घरील सदस्यांना व गावकऱ्यांना याविषयी सांगितले. उपसरपंच अजय कुडे व पोलिस पाटील समीर धोटे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
सदर महिला शेतमजूरी करुन स्वतःचा उदरनिर्वाह करित होत्या. मुलगी सुरेखा सात -आठ वर्षापासून आजारी होती. त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला ह्याचे कारण अस्पष्ट असून सध्या कोरोना काळात आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन तपासणी करते सोबतच आशा वर्कर प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवून असते मात्र या ठिकाणी कोणाचेही कसे लक्ष गेले नाही असा प्रश्न विचारला जात आहे पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, अमोल पुरी करित आहे.