शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

सवती मत्सराचा भडका, पत्नीकडून नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला पेटविण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 14:04 IST

nagpur Crime News : सवती मत्सराने पेटलेल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : सवती मत्सराने पेटलेल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांदेखत शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भरोसा सेल मध्ये ही घटना घडली. प्रसंगावधान राखत वेळीच पोलिसांनी आरोपी महिलेला अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. सविता विनोद सव्वालाखे (वय ३९) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. विनोद सव्वालाखे हा शांतीनगरात राहतो. त्याचे पॅकेजिंगचे काम आहे. मौसमी शेखर झोडे (वय ३२) ही त्याच्याकडे काम करीत होती. तिच्या पतीचे निधन झाल्याने मौसमी आणि विनोदचे सूत जुळले. विनोद आपल्या पत्नी, मुलांना अंधारात ठेवून मौसमी सोबत १९ मार्च २०२० ला लग्न केले. हा प्रकार माहीत झाल्यानंतर विनोदच्या घरी वाद वाढला. प्रकरण शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले.त्यांनी दोन्ही महिलांची समुपदेशन करण्यासाठी त्यांना भरोसा सेलमध्ये पाठविले. तेथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास हे सर्व  भरोसा सेलच्या आवारात बेंचवर बसून होते. अचानक सविताने धावत येऊन मौसमीच्या अंगावर पेट्रोलची भरलेली बाटली ओतली. लगेच तिने जवळ लपवून ठेवलेली माचीसही बाहेर काढली. हा प्रकार पाहून प्रसंगावधान राखत बाजूला असलेल्या महिला पोलीस धावल्या. त्यांनी सविताला घट्ट पकडून ठेवले. मौसमीच्या अंगावर पाणी ओतण्यात आले. या घटनेनंतर भरोसा सेलमध्ये एकच खळबळ उडाली. तेथील महिला पोलिसांनी सविताला पकडून प्रतापनगर ठाण्यात आणले.  पोलीस ठाण्यातही थयथयाट या प्रकारामुळे मौसमी प्रचंड घाबरली होती. ती तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करीत होती. मात्र सविताचा थयथयाट पोलीस ठाण्यातही सुरूच होता. हिला सोडणार नाही, असे ती ओरडून सांगत होती. तिला अटकाव केला नाही तर ती मोठा गुन्हा करू शकते,  हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी मौसमीकडून तक्रार लिहून घेतली. त्यावरून सविताविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारnagpurनागपूर