संशयावरून रागात पत्नीच्या गालाचा घेतला चावा, हातावर कुऱ्हाडीने वार

By प्रताप राठोड | Updated: April 2, 2023 20:24 IST2023-04-02T20:23:02+5:302023-04-02T20:24:10+5:30

शनिवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी साडेनउच्या सुमारास शितल माने या घरी असताना पती संदीप माने याने पत्नीच्या गालास चावा घेतला.

Out of suspicion, he bit his wife's cheek in anger, stabbed her with an ax on her hand | संशयावरून रागात पत्नीच्या गालाचा घेतला चावा, हातावर कुऱ्हाडीने वार

संशयावरून रागात पत्नीच्या गालाचा घेतला चावा, हातावर कुऱ्हाडीने वार

सोलापूर - पत्नीवर संशय घेवून रागामध्ये येत गालास चावा घेत दोन्ही हाताच्या दंडावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे घडली. या प्रकारानंतर पत्नीने पोलिसांमध्ये धाव घेत पतीविरूध्द तक्रार दिली आहे. शितल माने यांनी तक्रार दिली असून याप्रकरणी पोलिसांनी पती संदीप माने याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शनिवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी साडेनउच्या सुमारास शितल माने या घरी असताना पती संदीप माने याने पत्नीच्या गालास चावा घेतला. तसेच तू नीट राहत नाही, नीट वागत नाही असे म्हणून संशय घेत कुर्हाडीने शितल माने यांच्या दोन्ही हाताच्या दंडावर मारून जखमी केले. याप्रकरणी संदीप माने याच्यावर पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करित आहेत.

Web Title: Out of suspicion, he bit his wife's cheek in anger, stabbed her with an ax on her hand