भीतीपोटी आईने मुलाला ३ वर्षे घरातच डांबले; शेजाऱ्यांना सांगितले मुलगा आजारी आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 10:15 IST2023-02-24T10:13:48+5:302023-02-24T10:15:04+5:30

हा मुलगा आता ११ वर्षे वयाचा आहे. त्याला त्याची आई शाळेत जाऊ देत नव्हती. त्याचे शिक्षण थांबले होते

Out of fear, the mother kept the child in the house for 3 years; Neighbors were told that the boy was sick | भीतीपोटी आईने मुलाला ३ वर्षे घरातच डांबले; शेजाऱ्यांना सांगितले मुलगा आजारी आहे

भीतीपोटी आईने मुलाला ३ वर्षे घरातच डांबले; शेजाऱ्यांना सांगितले मुलगा आजारी आहे

गुरूग्राम - कोरोनाच्या भीतीपोटी हरयाणातील गुरूग्राम येथील एका महिलेने मुलाला गेल्या तीन वर्षांपासून घरातच डांबून ठेवले होते. या वर्तणुकीमुळे कंटाळलेल्या तिच्या पतीने अखेर पोलिसांच्या मदतीने त्या मुलाची नुकतीच  सुटका केली. 

हा मुलगा आता ११ वर्षे वयाचा आहे. त्याला त्याची आई शाळेत जाऊ देत नव्हती. त्याचे शिक्षण थांबले होते. आपल्या पत्नीला याबाबत सांगूनही ती ऐकत नसल्याने अखेर पतीने पोलिसांकडे धाव घेतली. मुलाची सुटका करून त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठविण्यात आले. बाहेरच्या कोणत्याही माणसांना मुलाची आई कोरोनाच्या भीतीमुळे घरात प्रवेश देत नव्हती. या महिलेच्या पतीलाही तिने दुसऱ्या घरात राहायला जाण्यास सांगितले होते.

तो भाड्याच्या घरात राहात होता. कोरोना साथ सुरू झाल्यानंतर ही महिला कधीही घराबाहेर पडली नाही. तिने आपल्या मुलालाही बाहेर जाऊ दिले नाही. ही महिला आपल्या घराची साफसफाईदेखील करत नव्हती. त्यामुळे त्या घरातून दुर्गंधी येत होती, असे शेजाऱ्यांनी सांगितले. आपला मुलगा आजारी आहे, असे ती नेहमी शेजाऱ्यांना सांगत असे. 

Web Title: Out of fear, the mother kept the child in the house for 3 years; Neighbors were told that the boy was sick