नैराश्यातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 17:20 IST2020-08-31T16:57:52+5:302020-08-31T17:20:03+5:30
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नैराश्यातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवले आयुष्य
जळगाव : तालुक्यातील वडली येथील मनीष संतोष पाटील (३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. मनीष हा गेल्या अनेक दिवसापासून नैराश्यात होता, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळ जळके येथील रहिवाशी असलेला मनीष अनेक वर्षापासून वडली येथे आई, वडीलांसह वास्तव्यास आला होता. त्याची बहिण व मेहुणे हे देखील वडलीत राहतात. मनीष हा पेंटर काम करायचा. तो विवाहित होता, मात्र काही कारणास्तव पत्नीसोबत नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. सोमवारी सकाळी ११ वाजता त्याचा मित्र बाळू पेंटर हा घराकडे गेला असता मनीष हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. पोलीस पाटील दिलीप पाटील व इतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. मनीष याच्या पश्चात वडील संतोष शंकर पाटील, आई भागाबाई, दोन विवाहित बहिणी व मेहुणा असा परिवार आहे. मनीष हा अत्यंत हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. या घटनेमुळे गावकरी तसेच नातेवाईकांना धक्का बसला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती