अंधेरीत भांडणाच्या रागातून महिलेने केली चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 02:33 IST2020-07-02T02:32:57+5:302020-07-02T02:33:11+5:30

न्यायालयाने तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले.

Out of anger over a dark quarrel, a woman kills four-year-old Chimurda | अंधेरीत भांडणाच्या रागातून महिलेने केली चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

अंधेरीत भांडणाच्या रागातून महिलेने केली चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

मुंबई : नातेवाइकांशी असलेल्या भांडणाच्या रागातून एका महिलेने त्यांच्या चार वर्षीय मुलाची हत्या केली. सहार परिसरात बुधवारी हा प्रकार घडला. पोलिसांनी मधू गाडे (४०) या महिलेला अटक केली आहे.

अंधेरी पूर्वच्या संतोषी माता चाळीत अमोल कदम (३२) हे पत्नी जयश्री (२८) आणि मुलगा श्रेयस (४) यांच्यासोबत राहत होते. श्रेयस सोमवारी रात्री घराबाहेरून अचानक गायब झाला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. तेथेच राहणाऱ्या गाडेच्या घरात ते मुलाला शोधायला गेले. त्या वेळी पाण्याने भरलेल्या बादलीत डोक्याची बाजू खाली करून बुडवून ठेवलेला श्रेयसचा मृतदेह त्यांना सापडला. तिने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले.

माळ्यावर नेऊन आवळला गळा
गाडेच्या चौकशीमध्ये कदम कुटुंबाशी भांडण झाल्यामुळे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. याच रागातून घराबाहेर एकट्या खेळणाºया श्रेयसला तिने घरी बोलावले आणि गळा दाबून त्याचे तोंड पाण्याच्या बादलीत बुडवून त्याची हत्या केल्याचे तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: Out of anger over a dark quarrel, a woman kills four-year-old Chimurda