व्हाॅट्स अॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 21:23 IST2019-08-27T21:22:53+5:302019-08-27T21:23:59+5:30
व्हाॅट्स अॅपच्या मदतीने ऑर्डर घेऊन तो कॉलेजमधील तरुणांपर्यंत गांजा पोहचवत असे.

व्हाॅट्स अॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या
ठळक मुद्दे सुनिल दास असं या तस्कराचं नाव आहे. दुसरीकडे आझाद मैदान युनिटनेही अरमान शेख (२०) याला बीपीटी काॅलनी वाडीबंदर येथून गांजा तस्करीप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी एएनसीचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) महाविद्यालयीन तरुणांना गांजाची विक्री करणाऱ्या तस्कराला अटक केली आहे. सुनिल दास असं या तस्कराचं नाव आहे. व्हाॅट्स अॅपच्या मदतीने ऑर्डर घेऊन तो कॉलेजमधील तरुणांपर्यंत गांजा पोहचवत असे. तर अरमान शेख (२०) यालाही बीपीटी काॅलनी वाडीबंदर येथून गांजा तस्करीप्रकरणी अटक केली आहे.