मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारच्या धाडीत केवळ ५४० रुपयांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:50 PM2021-12-02T21:50:24+5:302021-12-02T21:50:46+5:30

Mira Road Orchestra Bar : पोलिसांनी धाडीत ५४० रुपयांची रोकड जप्त करून बार कर्मचारी व बारबालासह १५ जणांना पकडले . दाखल गुन्ह्यात जुजबी कलमं लावण्यात आल्याचे आरोप होत आहेत.

Only Rs 540 in cash seized at Mira Road Orchestra Bar | मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारच्या धाडीत केवळ ५४० रुपयांची रोकड जप्त

मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारच्या धाडीत केवळ ५४० रुपयांची रोकड जप्त

Next

मीरारोड - ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा बारबालांचा अश्लील नाच आणि त्यावर आंबट शौकीन मद्यपींकडून केली जाणारी नोटांची बरसात अशी सर्वसाधारण स्थिती असताना मीरारोडच्या एका ऑर्केस्ट्रा धाडीत मात्र पोलिसांना केवळ २० रुपयांच्या २७ नोटाच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनीधाडीत ५४० रुपयांची रोकड जप्त करून बार कर्मचारी व बारबालासह १५ जणांना पकडले . दाखल गुन्ह्यात जुजबी कलमं लावण्यात आल्याचे आरोप होत आहेत. 

अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या सहाय्यक निरीक्षक तेजश्री शिंदे , सहाय्यक निरीक्षक कुटे व पथकाने २९ नोव्हेंबरच्या रात्री मीरारोडच्या शीतल नगर मधील यश ९ ह्या ऑर्केस्ट्रा बार वर छापा मारला.  त्यावेळी मंद प्रकाशात ४ महिला तोकडे कपडे घालून गाण्याच्या तालावर अश्लिल हावभाव करत मद्यपान करीत असलेल्या पुरुषांच्या आजुबाजूला नृत्य करुन पुरुष ग्राहकांना उत्तेजीत करीत होत्या. हॉटेल मधील कर्मचारी त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले.  बारच्या गल्ल्याची झडती घेता त्यात २० रुपये किमतीच्या २७ नोटा असे ५४० रुपये मिळून आले. 

गायिकेच्या नावाखाली अश्लील नाच करणाऱ्या ४ बारबाला, १ व्यवस्थापक, १ रोखपाल, ६ वेटर आणि ३ पुरुष गायक - वादक अश्या १५ जणांना बार मधून पकडण्यात आले. ३० नोव्हेंबर रोजी तेजश्री यांनी दिलेल्या फिर्यादीत सदर प्रकार नमूद असून मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात  त्या १५ जणांसह बारचा चालक व मालक अश्या एकूण १७ जणांना आरोपी केलेले आहे. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करताना जुजबी कलमं लावली आहेत. महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आदी कायदाची कलमे लावलेली नाहीत असा आरोप करत इतक्या मोठ्या ऑर्केस्ट्रा बारमधून केवळ ५४० रुपयेच पोलिसांना सापडले आहेत. या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

कारण ऑर्केस्ट्रा बार मध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात २ हजार वा ५०० च्या नोटांचे सुट्टे म्हणून १० , २० आदी रुपयांच्या कडक कोऱ्या करकरीत नोटा दिल्या जातात . कारण ह्या नोटा नाचणाऱ्या बारबालां वर उधळल्या जातात. नोटांचे हार सुद्धा असतात. त्यामुळे बार मधून केवळ ५४० रुपयांची रोकड आणि तेही फक्त २० रूपयांच्या नोटा सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Only Rs 540 in cash seized at Mira Road Orchestra Bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.