उल्हासनगरात डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक; मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 17:51 IST2021-10-10T17:50:56+5:302021-10-10T17:51:08+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे डॉक्टर हरी घनश्यामदास डोडा-६४ यांना शनिवारी दुपारी एका अज्ञात इसमाचा त्यांच्या मोबाईलवर फोन येऊन एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.

उल्हासनगरात डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक; मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- सदानंद नाईक
उल्हासनगर : एसबीआय बँकेचे अकाऊंट बंद होण्याची भीती दाखवित बँकेतील नोंदणीकृत मोबाईलवरील मॅसेज घेऊन डॉक्टर हरी डोडा यांची ऑनलाईन २ लाख १३ हजाराची फसवणूक झाली. सदर प्रकार शनिवारी दुपारी घडला असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे डॉक्टर हरी घनश्यामदास डोडा-६४ यांना शनिवारी दुपारी एका अज्ञात इसमाचा त्यांच्या मोबाईलवर फोन येऊन एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. एसबीआय बँकेतील खाते बंद होत असल्याची भीती त्यांना दाखवून बँकेत नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या मॅसेजची माहिती डॉक्टर कडून घेतली. त्यानंतर त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून २ लाख १३ हजार ६५ रुपये गेल्याने, त्यांना धक्का बसला. आपली ऑनलाईन फडवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.