एक वर्षाच्या मुलीवर मालाडमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 03:21 IST2020-03-17T03:20:51+5:302020-03-17T03:21:10+5:30

मालाड पश्चिमेत राहणाऱ्या या मुलीच्या शेजारच्याच घरात आरोपी राहात होता. तो कॅटरिंगचे काम करतो. शुक्रवारी आरोपीने मुलीला खेळायला नेले. त्यानंतर तिला चॉकलेट देतो असे सांगून तिला जवळच्या गार्डनमध्ये नेले.

 One year old girl raped in Malad | एक वर्षाच्या मुलीवर मालाडमध्ये बलात्कार

एक वर्षाच्या मुलीवर मालाडमध्ये बलात्कार

मुंबई : चॉकलेट खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एक वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सोमवारी मालाडमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
मालाड पश्चिमेत राहणाऱ्या या मुलीच्या शेजारच्याच घरात आरोपी राहात होता. तो कॅटरिंगचे काम करतो. शुक्रवारी आरोपीने मुलीला खेळायला नेले. त्यानंतर तिला चॉकलेट देतो असे सांगून तिला जवळच्या गार्डनमध्ये नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला घरी सोडले. मात्र घरी आलेल्या समीराचे रडणे काही केल्या थांबत नसल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे नेले. तपासणीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा संशय आल्याने डॉक्टरांनी समीराला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. शताब्दीमधील डॉक्टरांनी तिला तपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. याबाबत मालाड पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार मालाड पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला तो काहीही सांगण्यास टाळाटाळ करू लागला, मात्र नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  One year old girl raped in Malad