शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एक चोरी करायचा, दुसरा विकायचा अन् तिसरा खरेदी करायचा! सराईत दुचाकीचोर टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 9:34 PM

Crime News: एकाने दुचाकी चोरायची, चोरलेली दुचाकी दुसऱ्याने विकायची अन् तिसऱ्याने खरेदी करायची, अशी चोरीची अनोखी साखळी पद्धत पोलिसांच्या तपासात उघड झालीय.

सातारा - अलीकडे चोरीच्या पद्धतीचे एक एक किस्से समोर येऊ लागले असून, एकाने दुचाकी चोरायची, चोरलेली दुचाकी दुसऱ्याने विकायची अन् तिसऱ्याने खरेदी करायची, अशी चोरीची अनोखी साखळी पद्धत पोलिसांच्या तपासात उघड झालीय. याबाबत पोलिसांनी तिघाजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या सुमारे अडीच लाखांच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. युवराज अकोबा निकम (वय ५३, रा. सदर बझार, सातारा), सोमनाथ साहेबराव जाधव (२५) व स्वप्निल संजय जाधव (२६, दोघेही रा. शिंगणापूर, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (One to steal, another to sell and another to buy! Bike Thief gang busted in Satara )

याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील सदर बझारमधील युवराज निकम हा सराईत आरोपी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. या व्यसनापायी त्याला दुचाकी चोरीची सवय लागली. साताऱ्यातून दुचाकीची चोरी केल्यानंतर ही दुचाकी तो शिंगणापूर येथील सोमनाथ जाधव याच्याकडे विक्रीसाठी द्यायचा. सोमनाथने स्वप्निल जाधवला दुचाकी विकली. विशेष म्हणजे दुचाकी चोरीची आहे, हे माहीत असूनही स्वप्निलने दुचाकी खरेदी केली. अशाप्रकारे युवराज साताऱ्यातून दुचाकी चोरायचा आणि सोमनाथ पुढे दुचाकीची विक्री करून मोकळा व्हायचा. ही दुचाकी चोरीची साखळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणलीय.

गेल्या अनेक दिवसांपासून सातारा शहरातून रोज एक तरी दुचाकी चोरीस जात होती. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडाली होती. आता या टोळीला अटक केल्यामुळे दुचाकी चोरीचे प्रमाण आटाेक्यात येईल, असा विश्वास पोलिसांना आहे.पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार विश्वनाथ मेचकर, अविनाश चव्हाण, जोतिराम पवार, पंकज ढाणे, सुजित भोसले, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर