एकतर्फी प्रेमातून तरूणाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी, आई-वडिलांना जीवे मारण्याची दिली होती धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 13:34 IST2021-05-10T13:31:29+5:302021-05-10T13:34:08+5:30
Pune Crime News : २३ वर्षीय आरोपीचं नाव कुतुबुद्दीन हबीब काचवाला असून तो कसबा पेठेत राहतो. आरोपी तरूण आणि पीडित तरूणी काही वर्षांपूर्वी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतं होते.

एकतर्फी प्रेमातून तरूणाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी, आई-वडिलांना जीवे मारण्याची दिली होती धमकी
पुणे शहरातून एक एकतर्फी प्रेमातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने एकतर्फी प्रेमातून एका तरूणीकडे शरीरसुखाची मागणी केली. इतकंच नाही तर तो म्हणतो तसं केलं नाही तर तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची त्याने तिला धमकीही दिली आहे. मात्र, तरूणीने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीये.
lokmat.news18.com च्या वृत्तानुसार, आरोपी तरूणाने पीडित तरूणीकडे माझ्याशीच लग्न (Demand for marriage) कर असा तगादा लावला होता. तसेच त्यानं माझ्याशी लग्न नाही केलं, तर तुझ्या आई वडिलांना जीवे (Threat to death) मारेल, अशी धमकीही दिली आहे. मात्र, धमकीला न घाबरता तरूणीने मार्केड यार्ड पोलिसात तक्रार दिली होती. (हे पण वाचा ; धक्कादायक! पत्नीला शेवटचं पाहण्यासाठी मालकाने जाऊ दिलं नाही, रागात नोकराने केला मोठा कारनामा)
२३ वर्षीय आरोपीचं नाव कुतुबुद्दीन हबीब काचवाला असून तो कसबा पेठेत राहतो. आरोपी तरूण आणि पीडित तरूणी काही वर्षांपूर्वी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतं होते. आरोपी तरूण हा तेव्हापासून पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच पीडितेनंआरोपीला नकार दिला होता. पण तरीही आरोपी तरुणानं तिचा पिच्छा सोडला नाही. (हे पण वाचा : पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुडमधील घटना)
तरूणाने तरूणीला धमकी दिली होती की, 'तू जर दुसऱ्याशी लग्न करशील, तर त्या मुलाला आणि तुझ्या आई वडिलांना जीवे मारेन'. इतकंच नाही तर त्यानं पीडित तरूणीकडून एक सोन्याची चेन आणि ४० हजार रुपये अशी एकूण ८५ हजार रुपयांची खंडणी देखील उकळली आहे. त्यामुळे आरोपी युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून २१ वर्षीय पीडित तरूणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तरूणीने या तक्रारीत आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी केल्याचंही पीडितेनं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी कुतुबुद्दीन हबीब काचवालाला राहत्या घरातून अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.