पोलीस खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 18:02 IST2021-02-26T18:02:28+5:302021-02-26T18:02:59+5:30
One shot dead by Naxals : शुक्रवारी दुपारी त्याला गोळ्या झाडून ठार केले.

पोलीस खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून एकाची हत्या
गडचिरोली : पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एका इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्याची घटना एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे शुक्रवारी घडली. अशोक रामू कुरचामी (२९) रा.मंगुठा असे मृत इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत इसम हा एका लग्नासाठी सासरवाडी पुरसलगोंदी येथे आला होता. तो पोलिसांना माहिती देत असल्याबद्दल त्याची माहिती काढण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याला गोळ्या झाडून ठार केले.
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट हाणून पाडत त्यांचे जंगलातील शिबिर उद्ध्वस्त केले होते. याशिवाय गेल्या १५ दिवसात ३ नक्षलवाद्यांना अटक केली. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून आता पोलिसांना माहिती देणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या भागातील सुरजागड पहाडीवरील लोह खाण पुन्हा सुुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांनाही नक्षलवाद्यांकडून लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.