शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

तरुणाच्या खून प्रकरणात एकाला जन्मठेप; १४ साक्षीदारांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 21:41 IST

Crime News : खून प्रकरणात कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत (वय २५,रा.मेहरुण, मुळ रा.तेसाही ता.खागा, जि.फतेहपूर, उ.प्र.) याला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जळगाव : मेहरुणमधील मंगलपुरी भागात आसाराम छोटेलाल पवार (वय ३०, मुळ रा.कुंडीया, ता.हरसूद, जि.खंडवा, मध्य प्रदेश) याच्या खून प्रकरणात कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत (वय २५,रा.मेहरुण, मुळ रा.तेसाही ता.खागा, जि.फतेहपूर, उ.प्र.) याला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ६ फेब्रुवारी २०११ रोजी मेहरुणमधील मंगलपुरी भागात सुरेश बंजारा याचे काही लोकांशी भांडण चालू असताना आसाराम पवार हा भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. बंजारा याचा जावई कल्लूसिंग राजपूत याने चाकूने आसाराम याच्यावर वार केले होते. गंभीर जखमी झालेल्या आसाराम याचा उपचार सुरु असताना ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यापूर्वीच कल्लूसिंग व त्याचा भाऊ जितेंद्रसिंग याला अटक झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल ३०७ च्या गुन्ह्यात ३०२ चे कलम वाढविण्यात आले होते. तपासाधिकारी बी.ए.कदम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज झाले. यात सरकारपक्षातर्फे ॲड.प्रदीप महाजन यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यात मृताची पत्नी, भाऊ, आरोपीचे सासू, सासरे यांच्यासह मृत्यूपूर्व जबाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम खैरनार, डॉ.किरण पाटील, डॉ.उमेश वानखेडे व तपासाधिकारी कदम यांचा समावेश आहे. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्याअंती न्यायालयाने कल्लूसिंग याला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली तर जितेंद्र सिंग यास निर्दोष मुक्त केले.  सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रदीप एम.महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी राजेंद्र सैंदाणे यांनीही यात मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिसDeathमृत्यू