शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

कोयत्याचा धाक दाखवून मध्यरात्री ट्रकचालकाला लुटणाऱ्या एकाला अटक ; मुंबई- पुणे महामार्गावरील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 12:58 IST

चोरटयांनी ट्रक अडवून कोयत्याचा धाक दाखवत ४ हजार दोनशे वीस रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला.

ठळक मुद्देअटक करण्यात आलेल्या चोरट्याचे इतर तीन साथीदार पळून गेले असून पोलिसांकडून शोध घेणे सुरु

धायरी: मुंबई - बंगळुरू महामार्गावर पुणे येथील वडगांव बुद्रुक येथील उड्डाणपुलावर मध्यरात्री ट्रकचालकास कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटणाऱ्या चोरट्यास रात्रीच्या वेळीस गस्त घालणाऱ्या सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत ट्रकचालक मनजीत बच्चालाल साह (वय ३५, औरंगाबाद , मूळ .उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. उमेश रमेश जगधने (वय :३०, पापळवस्ती, गणपतनगर, बिबवेवाडी गावठाण, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.    

ट्रकचालक मनजीत साह हे (एमएच-१५. ईजी.७५९६) क्रमांकाची ट्रकमध्ये माल घेऊन मुंबईला निघाले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वडगांव उड्डाणपुलावर आल्यानंतर मोटारसायकलवर आलेल्या चार चोरटयांनी ट्रक अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याचे लॉकेट, रोख रक्कम असा एकूण ४ हजार दोनशे वीस रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला. दरम्यान स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर तेथून जात असताना त्यांना सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधला. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक इसम महामार्गावर संशयितरित्या मोटारसायकलवरून जात होता. त्या इसमास पोलिसांनी हटकले असता तो पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यास पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ लोखंडी कोयता, एक मोटारसायकल तसेच ट्रकचालकाचा लुटलेला एकूण ४ हजार दोनशे वीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे इतर तीन साथीदार पळून गेले असून सिंहगड रस्ता पोलीस त्यांचा शोध घेत  आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत.  --

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकThiefचोर