आजारपणाला कंटाळून इमारतीवरून उडी मारून एका व्यक्तीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 21:17 IST2018-12-17T21:16:30+5:302018-12-17T21:17:35+5:30
जिगर अतुल शहा असं मृत व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील साई वैभव इमारतीत राहत होता. तो 10 वर्षांपासूनच्या आजारपणामुळे त्रस्त होता.

आजारपणाला कंटाळून इमारतीवरून उडी मारून एका व्यक्तीने केली आत्महत्या
मुंबई - घाटकोपर पूर्व येथील पंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 36 वर्षाच्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे.
जिगर अतुल शहा असं मृत व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील साई वैभव इमारतीत राहत होता. तो 10 वर्षांपासूनच्या आजारपणामुळे त्रस्त होता. त्याने घाटकोपर पूर्व येथील 60 फूट रस्ता, विक्रांत सर्कल परिसरातील अनंत छाया इमारतीशेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे