हप्ता देण्यास नकार दिला म्हणून एका फेरीवाल्यास बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 21:00 IST2021-02-07T20:59:47+5:302021-02-07T21:00:25+5:30

Assaulting : मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २ मध्ये राहणारे अजित लोंढे हे मीरारोड रेल्वे स्थानक लगत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात .

One peddler was beaten to death for refusing to pay the hafta | हप्ता देण्यास नकार दिला म्हणून एका फेरीवाल्यास बेदम मारहाण 

हप्ता देण्यास नकार दिला म्हणून एका फेरीवाल्यास बेदम मारहाण 

ठळक मुद्देलोंढे यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता दोघांनी त्याला मारहाण करून निघून गेले . 

मीरारोड - मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर हप्ता देण्यास नकार दिला म्हणून एका फेरीवाल्यास बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटने प्रकरणी नया नगर पोलिसांनी ६ दिवसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . 

 

मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २ मध्ये राहणारे अजित लोंढे हे मीरारोड रेल्वे स्थानक लगत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात . ३१ जानेवारी रोजी रात्री साडे सातच्या सुमारास लोंढे हे भाजीविक्री करत असताना बाबू बाबर व राजा मदेसिया हे आले आणि इथे  असेल तर ४ हजार रुपये महिना द्यावा लागेल असे धमकावले . लोंढे यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता दोघांनी त्याला मारहाण करून निघून गेले . 

 

काहीवेळाने बाबर व राजा हे त्यांच्या सोबत अजय , रमेश , जयश्री बाबर , प्रेमा  मदेसिया , पिनका निषाद , जिनका , मनुमा यांनी परत येऊन लोंढे यांना लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली . जखमी लोंढे यांच्या डोक्यावर तसेच शरीरावर मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे . त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत . या घटनेने फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली करणाऱ्या माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे . 

Web Title: One peddler was beaten to death for refusing to pay the hafta