मैत्रीच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 20:42 IST2019-03-07T20:38:11+5:302019-03-07T20:42:09+5:30

याबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून कपिलला अटक करण्यात आली आहे.   

One murdered by the cause of friendship | मैत्रीच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाचा खून 

मैत्रीच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाचा खून 

ठळक मुद्देया वादात कपिल अनिल रुपवते (२३) याने संदीप पाळके (२४) याच्या छातीवर बसून बुक्क्याने बेदम मारहाण केली.संदीपचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला

मुंबई - चुनाभट्टी येथील लालडोंगर परिसरात काल मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास दोन मित्र मद्यपान करत असताना कोणाशी मैत्री करावी कोणाशी करू नये या वादात त्यांच्यात वाद पेटला. या वादात कपिल अनिल रुपवते (२३) याने संदीप पाळके (२४) याच्या छातीवर बसून बुक्क्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संदीप याचा मृत्यू झाला. संदीपचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून कपिलला अटक करण्यात आली आहे.   

डम्पर चालक कपिल हा मित्र संदीपसोबत मद्यपान करत लालडोंगर येथे बसला होता. त्यावेळी मित्र असलेल्या अभिजित याच्याशी मैत्रीच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन हत्येत झाले. कपिलने या वादातून संदीपला बेदम मारहाण केली. नंतर दारूच्या नशेत घरी गेलेल्या संदीपने आईला घडलेला प्रसंग सांगितला. छातीत दुखू लागल्याने संदीपला चेंबूरच्या सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यावेळी संदीपला मृत घोषित करण्यात आलं असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली. 

Web Title: One murdered by the cause of friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.