दोघांच्या भांडणात तिसऱ्यावर झाला गंभीर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:44 IST2018-08-03T18:43:45+5:302018-08-03T18:44:27+5:30
मित्रावर केला मित्रानेच चाकूहल्ला; मध्यस्थी झाला गंभीर जखमी

दोघांच्या भांडणात तिसऱ्यावर झाला गंभीर वार
मुंबई - मित्रावर चाकूहल्ला करताना मध्यस्थी करणाऱ्याच्या पोटात चाकू भोसकून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना धारावी येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. धारावी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ढोरवाडा, राजीव गांधी नगर, धारावी येथे राहणारे मायकल नाडर (२६) हे त्यांचा मामेभाऊ जॉन केनेरी व मित्र नेसामनी सुरेश हे तिघे बोलत होते. त्यावेळी अटक आरोपीने त्या ठिकाणी येऊन जुन्या भांडणाच्या रागातून नाडर याच्यावर चाकूने वार केला. मात्र त्याने तो वाचवला. त्या वेळी जॉन केनेरी यांनी त्याला अडवून मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी आरोपीने केनेरी यांच्या पोटात चाकूने भोसकून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती धारावी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.