एक लाख दहा हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 00:24 IST2020-07-05T00:24:27+5:302020-07-05T00:24:57+5:30
अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, असे सांगून लिंक पाठवून त्याद्वारे एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. आरोपीच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एक लाख दहा हजारांची फसवणूक
नवीन पनवेल : अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, असे सांगून लिंक पाठवून त्याद्वारे एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. आरोपीच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
खारघर सेक्टर ५ येथे राहणारे आयुष राम यांचे जबलपूरच्या बँकेत अकाउंट आहे. त्यांना एका अनोळखी इसमाचा फोन आला. यावेळी त्याने तुमचा मित्र शुभम तुम्हाला दहा हजार रुपये पाठविणार असून, तुमचा अकाउंट नंबर द्या, असे सांगून फोन ठेवून दिला. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठविली. त्या लिंकवर क्लिक केले असता, आयुष कुमार यांच्या अकाउंटमधून दहा हजार रुपये ट्रान्सफर झाले. यावेळी आयुष कुमार यांनी समोरील व्यक्तीकडे पैसे परत मागितले. मात्र, त्याने ते दिले नाहीत. थोड्या वेळाने आयुष कुमार यांनी त्यांचा मोबाइल तपासला असता, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख १० हजार रुपये डेबिट झाले असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, आयुष यांनी खारघर पोलीसांत गुन्हा दाखल केला.