व्यावसायिक वादातून एकाची धारदार शस्त्रानं हत्या; मध्यरात्री मुब्रा येथे घडली थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 08:54 IST2021-08-06T08:54:10+5:302021-08-06T08:54:26+5:30
पार्टी करण्यासाठी गेलेल्या इसमाला रात्री वाटेतच गाठले आणि त्याचा खून केला

व्यावसायिक वादातून एकाची धारदार शस्त्रानं हत्या; मध्यरात्री मुब्रा येथे घडली थरारक घटना
कुमार बडदे
मुंब्राः कथित व्यावसायिक वादातून समिर पाथरे या दारुचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाची गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. तो मुंब्र्यातील ठाकुरपाडा परीसरातील गाझी महल या इमारती मध्ये राहत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तो त्याच्या काही मित्रा बरोबर पार्टी करण्यासाठी गेला होता.
तेथून परत आल्यानंतर त्याचे मित्र येथील मुख्य रस्ता जवळ थांबले होते. तो त्याच्या दुचाकी वरुन घरी चालला होता.त्याच्या पाळतीवर असलेल्यांनी त्याच्या घराजवळील रस्त्यावर त्याच्यावर हल्ला करताच तो दुचाकीसह खाली पडला. त्या हल्ल्यातून सावरण्यापूर्वीच त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले तसेच डोक्यावर प्रहार करण्यात आला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला आहे.