लोणंद येथे गोळ्या घालून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 16:09 IST2020-01-05T16:06:11+5:302020-01-05T16:09:46+5:30

मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

One has been shot dead in Lonand village | लोणंद येथे गोळ्या घालून एकाचा खून

लोणंद येथे गोळ्या घालून एकाचा खून

सातारा : लोणंद खंडाळा गावच्या हद्दीतील कॅनॉलजवळ एकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडेगावच्या हद्दीतील कॅनॉलजवळ ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

संबंधित व्यक्तीच्या छातीवर बंदुकीतून गोळ्या घातल्याचे दिसून येत आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून, संबंधिताचा इतर ठिकाणी खून करून या कॅनॉलशेजारी मृतदेह टाकण्यात आला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात मृतदेहाचे फोटो पाठविण्यात आले असून, कोणी बेपत्ता आहे का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. लवकरच या खूनप्रकरणाचा आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटेल, असे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: One has been shot dead in Lonand village