एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील... ‘त्या’ शेवटच्या चिठ्ठीत अनेक खुलासे; डॉक्टर तरुणीच्या मित्राला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:37 IST2026-03-11T11:36:57+5:302026-03-11T11:37:20+5:30

तरुणीचा मानसिक छळ झाल्याचे उघड

One day you will be found in the fridge... Many revelations in 'that' last note; Doctor girl's friend arrested | एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील... ‘त्या’ शेवटच्या चिठ्ठीत अनेक खुलासे; डॉक्टर तरुणीच्या मित्राला अटक

एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील... ‘त्या’ शेवटच्या चिठ्ठीत अनेक खुलासे; डॉक्टर तरुणीच्या मित्राला अटक

मुंबई : अँटॉप हिल पोलिसांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मंगळवारी फजल मोहम्मद खान (३१) या तरुणाला अटक केली. त्याला मध्य मुंबईतील लोअर परळ येथून अटक केली आहे. फजलवर तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, स्तुतीच्या सुसाईड नोटमधून अनेक खुलासे समोर आले. स्तुतीच्या मैत्रिणींना फजलच्या छळाबद्दल माहिती होती. त्यावरून त्या एक दिवस तु फ्रीजमध्ये सापडशील असे  स्तुतीला चिडवत असत, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे.

डॉ. स्तुती यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मंगळवारी करण्यात आले. त्यात त्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. ८ मार्चला सायंकाळी स्तुतीचे आई-वडील जेवणासाठी बाहेर गेले होते. ते रात्री १० वाजता घरी आले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता बजरंग यांनी तिच्या रूमचा दरवाजा ठोठावला. पण, प्रतिसाद न मिळाल्याने बजरंग यांनी दरवाजा तोडून पाहिले असता  ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत 
स्तुती सापडली.

सुसाईड नोटमध्ये काय आढळले?

पोलिसांनी खोलीतून स्तुतीच्या हस्ताक्षरातील सहा पानी सुसाइड नोट ताब्यात घेतली. ज्यात तिने खानचे नाव घेतले आहे आणि त्याच्यावर सतत छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी बजरंग यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करून फजलला अटक केली आहे. आरोपी खान विमा एजंट म्हणून काम करतो. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून डॉ. स्तुती आणि खान यांची ओळख, मैत्री होती.

...म्हणून टोकाचे पाऊल

एमडीएसची विद्यार्थिनी खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, जो  तिच्या चारित्र्याबद्दल अपमानास्पद ‘शब्दा’चा वापर करून दुखावणारी टिप्पणी करत होता. पीडित मुलगी आणि वरळी येथील रहिवासी आरोपी एका डेटिंग अॅपद्वारे भेटले होते व एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते, असे तपासात आढळले.

Web Title : डॉक्टर की आत्महत्या: चौंकाने वाले सुसाइड नोट के बाद दोस्त गिरफ्तार।

Web Summary : मुंबई पुलिस ने एक डॉक्टर को आत्महत्या के लिए उकसाने के आरोप में एक व्यक्ति को गिरफ्तार किया। सुसाइड नोट में लगातार उत्पीड़न का खुलासा हुआ। दोस्तों ने उसे फ्रीजर में खत्म होने के बारे में चिढ़ाया, जिससे उसे होने वाले कष्ट का संकेत मिला। आरोपी पुलिस हिरासत में है।

Web Title : Doctor's suicide: Friend arrested after revelations in chilling suicide note.

Web Summary : Mumbai police arrested a man for allegedly abetting the suicide of a doctor. The suicide note revealed constant harassment. Friends teased her about ending up in the freezer, hinting at the torment she faced. The accused is in police custody.