शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

साकीनाका येथून एक कोटीचे कोकेन जप्त, आफ्रिकन नागरिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 3:12 AM

पबसह घरगुती पार्टींमध्ये मुंबईसह राज्यभरातील तरुणांना कोकेनचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला अमलीपदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : पबसह घरगुती पार्टींमध्ये मुंबईसह राज्यभरातील तरुणांना कोकेनचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला अमलीपदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अल्ला कौदिओ बोरीस (४२) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ कोटी ३२ लाखांचे २२० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.पश्चिम आफ्रिकेतील रहिवासी असलेला बोरीस हा साकीनाका येथील ९० फूट रोडवर येणार असल्याची माहिती एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने सोमवारी सापळा रचला. बोरीस तेथे येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २२० ग्रॅम कोकेन सापडले. एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, बोरीस हा कोकेनचा विक्रीचा मुख्य विक्रेता आहे. तो पश्चिम उपनगरातील समुद्रकिनारी आयोजित केल्या जाणाºया घरगुती तसेच खासगी पार्टीत कोकेनची विक्री करीत असे. तसेच पबमध्येही तरुणाईला हेरून त्यांच्यापर्यंत कोकेन पुरवत असे. बड्या घरातील मुले, मुली त्याच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर येत आहे.पार्टी ड्रग टार्गेटवरएएनसीने पार्टी ड्रगवर धडक कारवाई सुरू केल्याचे या कारवाईतून उघड होत आहे. त्यांनी शाळा, महाविद्यालयांतील विद्याार्थ्यांना एक्स्टसी(एमडीएमए) या अमलीपदार्थाची विक्री करणाºया उत्कर्ष पतंगे(२५) या तरुणाला रविवारी अटक केली. त्याच्याकडून एमडीएमएच्या ९७ गोळ्या हस्तगत केल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई