सेक्स रॅकेट चालवणारी अटकेत, दोन तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 01:52 IST2020-12-12T01:51:56+5:302020-12-12T01:52:03+5:30

sex racket : एका ठरावीक मोबाइल क्रमांकावर फोन केल्यानंतर एक महिला शरीरविक्रयासाठी काही तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली होती.

one Arrested for operating sex racket | सेक्स रॅकेट चालवणारी अटकेत, दोन तरुणींची सुटका

सेक्स रॅकेट चालवणारी अटकेत, दोन तरुणींची सुटका

ठाणे : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेणाऱ्या अफसाना उर्फ जान्हवी लष्कर (३३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. तिच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एका ठरावीक मोबाइल क्रमांकावर फोन केल्यानंतर एक महिला शरीरविक्रयासाठी काही तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे या पथकाने सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजीवडा येथील हॉटेल कॅपिटॉल येथील एक रूम बुक करून या महिलेकडे मुलींबाबत विचारणा केली. एका बनावट गिऱ्हाईकाच्या मदतीने ठरावीक रक्कम ठरल्यानंतर १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास या पथकाने या हॉटेलमध्ये सापळा लावला. त्यावेळी दोन तरुणींना घेऊन आलेल्या अफसाना नावाच्या या आरोपी महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. 

Web Title: one Arrested for operating sex racket