खून प्रकरणी एकास अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 21:26 IST2020-10-07T21:26:02+5:302020-10-07T21:26:27+5:30

Murder : औसा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

One arrested in murder case; Three days in police custody | खून प्रकरणी एकास अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

खून प्रकरणी एकास अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

ठळक मुद्दे औसा तालुक्यातील शिंदाळावाडी शिवारात मच्छिंद्र काशीनाथ गरड (४३) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला होता.

बेलकुंड (जि. लातूर) : मद्यपी पित्याकडून आईचा सतत छळ होत असल्याच्या कारणावरुन दोघा मुलांनी पित्याचा खून केल्याची घटना औसा तालुक्यातील सिंदाळावाडी येथे घडली. याप्रकरणी बुधवारी पहाटेच्या सुमारास कृष्णा गरड याला अटक करण्यात आली. त्यास औसा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील शिंदाळावाडी शिवारात मच्छिंद्र काशीनाथ गरड (४३) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला होता. दरम्यान, गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याबाबत भादा पोलीस ठाण्यात काशीनाथ गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एकाला पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याला औसा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: One arrested in murder case; Three days in police custody