बेकायदेशीररीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 19:20 IST2021-08-27T19:19:28+5:302021-08-27T19:20:08+5:30
Illegal Weapon Case : लातुरात गुन्हा दाखल : भातांगळी येथील घटना

बेकायदेशीररीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
लातूर : बेकायदेशीररीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी लातूर तालुक्यातील भातांगळी येथील एकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, भातांगळी येथील प्रकाश रामकिशन बेंबडे यांच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल आढळून आले. जिल्हाधिकारी यांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३)चे उल्लंघन करताना मोटरसायकलवर ते मिळाले. त्यावरून पोलिसांनी त्यांच्या जवळील पिस्टल (किंमत दहा हजार रुपये), जिवंत काडतूस, रंगाची मॅगझिन, मोटर सायकल असा एकूण चाळीस हजाराचे साहित्य जप्त केले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक तानाजी दिगंबर चिरले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश रामकिसन बेंबडे याच्याविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसात कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा व १३५ मोपकानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.