देशी बनावटीच्या पिस्तूलह एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 15:54 IST2023-04-20T15:54:04+5:302023-04-20T15:54:14+5:30

आझादसिंग सुदानसिंग भाटीया (२८, रा. उमर्टी जि.बडवानी, मध्यप्रदेश ) असे या अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

One arrested for possessing a country-made pistol | देशी बनावटीच्या पिस्तूलह एकास अटक

देशी बनावटीच्या पिस्तूलह एकास अटक

- नरेंद्र खंबायत

अडावद :  देशी बनावटीचे पिस्तूल व ५ काडतूसासह मध्यप्रदेशातील युवकाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी उनपदेवनजीक  अडावद ता. चोपडा पोलिसांनी ही कारवाई केली. 

आझादसिंग सुदानसिंग भाटीया (२८, रा. उमर्टी जि.बडवानी, मध्यप्रदेश ) असे या अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल व मोबाईलसह जवळपास ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
मध्यप्रदेशातून एक जण  देशी कट्टा घेवून विक्री करण्यासाठी चोपडा तालुक्यात  येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरुन

अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा,  फौजदार चंद्रकांत पाटील, सहाय्यक फौजदार शरिफ तडवी, कैलास तायडे, कादिर शेख, जयदीप राजपुत, सुनिल तायडे, सतिष भोई, विनोद धनगर, प्रदीप पाटील यांनी ही कारवाई केली.

Web Title: One arrested for possessing a country-made pistol