प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडीसच्या फसवणूकप्रकरणी आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:58 IST2019-04-02T20:57:21+5:302019-04-02T20:58:43+5:30

ही याप्रकरणातील दुसरी अटक आहे. 

One arrested for cheating famous pop singer Rodney Fernandes | प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडीसच्या फसवणूकप्रकरणी आणखी एकाला अटक

प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडीसच्या फसवणूकप्रकरणी आणखी एकाला अटक

ठळक मुद्दे2015 मध्ये रॉडनीची ओळख मयुर अगरवाल याच्यासोबत झाली.2017 नंतर व्याजाची रक्कम मिळण्यास बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी 17.77 कोटींची फसवणूक झाल्याचीआर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तक्रार केली.

मुंबई - प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडीसची 23 कोटी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय अग्रवाल नावाच्या आरोपाला अटक केली आहे. ही याप्रकरणातील दुसरी अटक आहे. 
फाईंडिग फॅनीसारख्या चित्रपटांसाठी तसेच स्वच्छ भारत अभियानासाठी गायन केलेल्य रॉडनीच्या तक्रारारीनुसार, 2015 मध्ये रॉडनीची ओळख मयुर अगरवाल याच्यासोबत झाली. त्याने त्याचे गुजरातमधील मामा संजय अग्रवाल यांच्यामार्फत जमिनीमध्ये पैसे गुंतवून 18 ते 22 टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार ऑक्‍टोबर 2015 पासून रॉडनीने त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसेच रॉडनीने यापूर्वी खरेदी केलेले सोन्याचीही अग्रवालांकडे गुंतवणूक केली. असे एकूण पंधरा कोटी साठ लाख रुपये 2018पर्यंत अगरवालकडे जमा करण्यात आले. सुरुवातीला 2016 पर्यंत रॉडनीला अग्रवालने नियमित व्याजाचे पैसे दिले त्यामुळे त्याच्या बॅण्डमधील इतर 9 सदस्यांनीही अग्रवालांकडे सुमारे दोन कोटी पंधरा लाख रुपये गुंतवले. 
2017 नंतर व्याजाची रक्कम मिळण्यास बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी 17.77 कोटींची फसवणूक झाल्याचीआर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार या प्रकरणी संजय अग्रवाल, मयूर अग्रवाल बंगेरा व लोहादीया यांच्याविरुद्ध 25 फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी मयूर अग्रवालला अटक केली होती. फर्नांडीसप्रमाणेच फसवणूक झालेले आणखी पाच तक्रारदार पोलिसांकडे आले असून त्यामुळे याप्रकरणातील फसवणूकीची रक्कम 23 कोटींवर पोहोचली आहे.   

Web Title: One arrested for cheating famous pop singer Rodney Fernandes