Old woman died in tanker accident | टँकरच्या धडकेत वृद्धे महिलेचा मृत्यू
टँकरच्या धडकेत वृद्धे महिलेचा मृत्यू

मुंबई - भरधाव टँकरच्या धडकेत वृद्धे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. चंचल रतीलाल सावला (७९) असे मृत वृद्धेचे नाव असून गावदेवी पोलिसांनी या प्रकरणी टँकर चालकाला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  बुधवारी सकाळी 09:50 वाजताच्या सुमारास  गावदेवी, शेटना हाऊस येथे राहणाऱ्या चंचल सावला या बाग शोरुम समोर, शिशिर जंक्शन, ग्रांट रोड (प) येथून रस्ता ओलांडत होत्या.त्यावेळी यातील अटक आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार टँकर भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिली. गंभीर जखमी होऊन त्यांचा यातच मृत्यू झाला.

Web Title: Old woman died in tanker accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.