जालन्यात जुन्या भांडणावरुन तरुणाचा खून; १४ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:31 IST2018-07-26T14:29:55+5:302018-07-26T14:31:27+5:30

अंबड तालुक्यातील करंजळा येथील ३३ वर्षीय तरुणाचा जुन्या भांडणाच्या  कारणावरून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.

In old rivalry The murder of the young man at Jalna | जालन्यात जुन्या भांडणावरुन तरुणाचा खून; १४ जणांविरुध्द गुन्हा दाखल

जालन्यात जुन्या भांडणावरुन तरुणाचा खून; १४ जणांविरुध्द गुन्हा दाखल

जालना : अंबड तालुक्यातील करंजळा येथील ३३ वर्षीय तरुणाचा जुन्या भांडणाच्या  कारणावरून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या  प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असून आरोपी फरार झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपींनी  गैरकायद्याची मंडळी जमा करून शेख कदीर शेख सईद अली (वय ३३ रा.करंजळा ता. अंबड ह. मु. बोडखा ता. पैठण) यांच्या शेतात जाऊन मागील भांडणाच्या कारणावरुन  शेख कदीरला काठी व  कु-हाडीने जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा शेतातच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

या प्रकरणी शेख सईद अली शेख बादशहा यांच्या फिर्यादीवरून प्रकाश आसाराम नांद्रे, सूर्यभान विश्वनाथ नांद्रे, छगन बाबूराव नांद्रे,  लक्ष्मण नवनाथ नांद्रे, बाळू सूर्यभान नांद्रे, नवनाथ बाबूराव नांद्रे, आसाराम शिवराम नांद्रे, काकासाहेब श्यामराव वैद्य, पुंजाराम निवृत्ती वैद्य, महादेव निवृत्ती वैद्य,  कांता शंकर काकडे, अनिल शंकर काकडे, नागेंदर श्यामराव वैद्य, मदन श्यामराव वैद्य  (सर्व रा. करंजळा) यांच्या विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे करत आहेत. 

Web Title: In old rivalry The murder of the young man at Jalna