the old person sucide due to tired illness At the Kharalwadi in Pimpri | पिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या
पिंपरीतील खराळवाडी येथे आजारपणाला कंटाळून स्वत: ला पेटवून घेत वृद्धाची आत्महत्या

पिंपरी : आजारपणाला कंटाळून वृद्धाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पिंपरीतील खराळवाडी येथे ही घडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 
    रुपचंद धोंडीराम सुदेंचा (वय ८५, रा. धमार्जी कलापुरी चाळ,  खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक सतिश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुपचंद यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये ते  भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.


Web Title: the old person sucide due to tired illness At the Kharalwadi in Pimpri
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.