धक्कादायक! शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्यानं महिला साईभक्तांना पाठवले अशील मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 15:41 IST2021-10-21T15:41:07+5:302021-10-21T15:41:37+5:30
Crime News: शिर्डीमधील साई संस्थानामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साई संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने काही महिली साईभक्तांना मेसेजमध्ये अश्लील व्हिडीओ पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक! शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्यानं महिला साईभक्तांना पाठवले अशील मेसेज
अहमदनगर - शिर्डीमधील साई संस्थानामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साई संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने काही महिली साईभक्तांना मेसेजमध्ये अश्लील व्हिडीओ पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या या प्रकरणी पीडित महिलांनी तक्रार केल्याचे वृत्त आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे. ही मागणी राहता तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी भाग्यश्री बानायत यांच्याकडे निवदेन देऊन केली आहे.
या निवेदनात असलेल्या उल्लेखानुसार संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने साईभक्त महिलांशी जवळीक साधली. त्यानंतर त्याने या महिलांना मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ असलेले मेसेज पाठवले. या महिलांनी शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे तक्रार केली आहे. संबंधित महिलांच्या तक्रारींची नोंद घेण्यात यावी. तसेच योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.