कार्यालयात महिलांच्या चेंजींगरुममध्ये मोबाईल कॅमेरा, अश्लील शूटिंग करणारा कर्मचारी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 03:30 PM2019-05-18T15:30:02+5:302019-05-18T15:42:04+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

In the office women changing room hidden the mobile camera to shoot of the valgur shooting | कार्यालयात महिलांच्या चेंजींगरुममध्ये मोबाईल कॅमेरा, अश्लील शूटिंग करणारा कर्मचारी अटकेत 

कार्यालयात महिलांच्या चेंजींगरुममध्ये मोबाईल कॅमेरा, अश्लील शूटिंग करणारा कर्मचारी अटकेत 

googlenewsNext
ठळक मुद्दे गणेश हा अनेक महिन्यांपासून हाऊस किपींगचे काम करत होता. मंगळवारी या कार्यालयात एक महिला कपडे बदलण्यासाठी गेली असताना. पोलिसांनी गणेशला अंधेरीच्या लिंक रोड परिसरातून अटक केली आहे.

मुंबई - अंधेरीतील एका कार्यालयातील महिलांच्या चेंजींग रुममध्ये मोबाईल कॅमेरा लावून महिलांचे अश्लील चित्रीकरण करणाऱ्या ३५ वर्षीय कर्मचाऱ्याला सहार पोलिसांनीअटक केली आहे. गणेश नदागे असं या अटक आरोपीचं नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

मरोळ परिसरात एका खासगी कंपनीत गणेश हा अनेक महिन्यांपासून हाऊस किपींगचे काम करत होता. दरम्यान कुणालाही चाहूल न लागेल अशा पद्धतीने त्याने महिलांच्या चेंजींगरुममध्ये लक्ष न जाणाऱ्या ठिकाणी मोबाईल लपवून महिलांचे अश्लील चित्रीकरण करत होता. मंगळवारी या कार्यालयात एक महिला कपडे बदलण्यासाठी गेली असताना. तिच्या नजरेस हा कॅमेरा पडला.कोणीतरी हा मोबाईल विसरून गेलं असावा असा अंदाज करत त्या तरुणीने तो मोबाईल कंपनीच्या मॅनेजरकडे देण्यास जात असताना मोबाईलचा कॅमेरा चालू असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मोबाईलच्या गॅलरीत जाऊन पाहिले. मोबाईलमध्ये तरुणीचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण झाले असल्याचे तिने पाहिले. त्यानंतर तातडीने ही धक्कादायक बाब तिने मॅनेजरच्या लक्षात आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मॅनेजरनो तो मोबाईल घेऊन सहार पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी सर्वत्र चौकशी केली. मात्र, मोबाईल घेण्यास कुणीही पुढे येत नव्हते. त्यावेळी पोलिसांनी मोबाईलमधील सिम कार्ड, मोबाईल नंबर आणि इतर महत्वाच्या गोष्टी पडताळून पाहिल्या असता तो मोबाइल गणेशचा असल्याचे लक्षात आले. गणेशला पकडायला पोलीस जाणार हे कळताच त्या आधीत कार्यालयातून गणेशने पळ काढला होता. दरम्यान पोलिसांनी गणेशला अंधेरीच्या लिंक रोड परिसरातून अटक केली आहे. मागील काही महिन्यांपासून अशा प्रकारे छुप्या पद्धतीने महिलांचे चित्रीकरण करत असल्याची कबूली त्याने दिली आहे. या प्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: In the office women changing room hidden the mobile camera to shoot of the valgur shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.