मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट, समित ठक्करची कोठडी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:29 IST2020-10-31T05:00:55+5:302020-10-31T07:29:48+5:30
Crime News : सोशल मीडियावर आक्रमकपणे सक्रिय राहणाऱ्या समितने ऑगस्टमध्ये ट्विटरवर सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार राऊत यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट, समित ठक्करची कोठडी वाढली
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर गरळ ओकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी समित ठक्कर याच्या पोलीस कोठडीत २ नोव्हेंबरपर्यंत वाढ झाली आहे.
आरोपी समित प्रॉपर्टी डीलर असून त्याचे वडील वाहतूक व्यावसायिक आहेत. सोशल मीडियावर आक्रमकपणे सक्रिय राहणाऱ्या समितने ऑगस्टमध्ये ट्विटरवर सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार राऊत यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. सीताबर्डी पोलिसांनी समित ठक्करविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तो राजकोट (गुजरात)ला पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस करून सीताबर्डी पोलिसांचे एक पथक राजकोटला पोहोचले. तेथे त्याच्या मुसक्या बांधून ठक्करला २६ ऑक्टोबरला नागपुरात आणण्यात आले होते.