शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 21:59 IST

तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली.

बाभूळगाव: इंदापूर शहरात आजीकडे वास्तव्यास असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे करीत करून छेडछाड केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यानुसार पोलीसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवम संतोष क्षीरसागर, संतोष मोहन क्षीरसागर, सारिका संतोष क्षीरसागर (सर्व रा. अंबीकानगर, देशपांडे वाड्यासमोर, इंदापूर, जि. पुणे) व मंगल मोहन क्षीरसागर (रा. जिती, ता. करमाळा, जि. सोलापूर), शामल विनायक जाधव (रा. कात्रज, भारती विद्यापीठ पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलगी ही तीच्या आजीकडे इंदापूर येथे रहात आहे. तर फिर्यादी या बारामती येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. तर त्यांच्या सासुबाई या वयस्कर व एकट्याच आहेत. त्या नातीसोबत इंदापूर येथे राहत आहेत. तसेच फिर्यादीच्या  सासुबाई या वयोवृृद्ध व मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने अनेकदा औषधोपचार कामी व कार्यक्रमानिमीत्त नातेवाईकाकडे वारंवार बाहेरगावी जातात. यावेळी पीडीत मुलगी घरी एकटीच राहत आहे.

फिर्यादी यांचे सासुबाईचे घराशेजारी त्यांचे जवळचे नातेवाईक राहण्यास आहेत. त्यांचेच नात्यातील शिवम संतोष क्षीरसागर याने नात्यातील ओळखीचा गैरफायदा घेत फिर्यादी यांचे अल्पवयीन मुलीशी जवळीक केली. तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली. या घटनेबाबत मुलीच्या आईला नातेवाईकांकडुन माहिती मिळाली. त्यानंतर मुलीच्या आईने आरोपी आणि पीडित यांच्याकडे केलेल्या चौकशी केली.यावेळी संबंधित प्रकार खरा असल्याचे पुढे आले.यावेळी मुलीच्या आईने आरोपीविरोधात इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दि. २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे  करीत आहेत. 

टॅग्स :IndapurइंदापूरPOCSO Actपॉक्सो कायदाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक