जन्मदात्या आईला मुलगी झाली 'नकुशी'; १८ दिवसाच्या बाळाची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 20:58 IST2018-11-29T20:54:32+5:302018-11-29T20:58:58+5:30
सेलेस्टिन असं या विकृत महिलेचे नाव असून दुसरीही मुलगी झाल्याने चिडलेल्या नवऱ्याच्या रागाने मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

जन्मदात्या आईला मुलगी झाली 'नकुशी'; १८ दिवसाच्या बाळाची केली हत्या
ठळक मुद्दे सेलेस्टिनच्या नवऱ्याचे याआधी देखील एक लग्न झाले होतेपुन्हा मुलगी झाल्याने सेलेस्टिनवर तिचा पती चिडला होता 18 दिवसांच्या मुलीला उचलले आणि जमिनीवर आपटले
तामिळनाडू - जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईने १८ दिवसाच्या बाळाची हत्या केली आहे. बाळाला जमिनीवर आपटून ही हत्या करण्यात आली आहे. सेलेस्टिन असं या विकृत महिलेचे नाव असून दुसरीही मुलगी झाल्याने चिडलेल्या नवऱ्याच्या रागाने मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.