परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 13:08 IST2021-11-24T13:07:57+5:302021-11-24T13:08:44+5:30
कोर्टाची हीच नोटीस त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाजावर लावण्यात आली. परमबीर यांच्यावर मुंबईसह विविध ठिकाणी खंडणीचे सहा गुन्हे नोंद झाले.

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जुहू येथील घराबाहेर मंगळवारी ते फरार असल्याची नोटीस लावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणीत गोरेगाव पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी प्रकरणी कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केले होते.
कोर्टाची हीच नोटीस त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाजावर लावण्यात आली. परमबीर यांच्यावर मुंबईसह विविध ठिकाणी खंडणीचे सहा गुन्हे नोंद झाले. तसेच तीनवेळा अजामीन पात्र वाॅरंटही बजावण्यात आले आहे.