३ रुपये दिले नाही म्हणून पाडला दात, हॉटेल चालकांची दबंगगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 19:37 IST2021-12-29T19:34:00+5:302021-12-29T19:37:45+5:30

Crime News : राग येऊन हॉटेल मालक रघुनंदन जैयस्वाल याने तोंडावर ठोसा मारून सुनील याचा दात पाडल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

Not paid 3 rupee so broken the teeth, dabanggiri of Hotelier | ३ रुपये दिले नाही म्हणून पाडला दात, हॉटेल चालकांची दबंगगिरी

३ रुपये दिले नाही म्हणून पाडला दात, हॉटेल चालकांची दबंगगिरी

सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-४ श्रीराम चौकातील श्रीराम हॉटेल मध्ये सुनील जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी साडे आठ वाजता समोसापाव खाल्ल्यानंतर ३ रुपये दिले नाही. याचा राग येऊन हॉटेल मालक रघुनंदन जैयस्वाल याने तोंडावर ठोसा मारून सुनील याचा दात पाडल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ मधील श्रीराम चौकात रघुनंदन जैयस्वाल याचे श्रीराम हॉटेल आहे. मंगळवारी सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास सुनील मधुकर जाधव यांनी हॉटेल मध्ये समोसापाव खाण्या करीता घेतला. मात्र ३ रुपये दिले नाही. याचा राग येऊन जैयस्वाल याला येवून त्याने सुनीलला शिवीगाळ करून तोंडावर जोरात ठोसा मारला. जोरदार ठोसाने सुनील याचा दात पडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रघुनंदन जैयस्वाल याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Not paid 3 rupee so broken the teeth, dabanggiri of Hotelier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.